रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना एका प्रवासी विमानाला आग लागली. या दुर्घटनेत ४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या शीरीमीमेटयेवो विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे हे विमान होते.

मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर बिघाड झाल्यामुळे लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरले. ७३ प्रवाशांसह ५ क्रू मेंबर या विमानामध्ये होते. ७८ पैकी ३७ प्रवासी या भीषण दुर्घटनेतून बचावले अशी माहिती रशियाच्या तपास समितीच्या प्रवक्त्याने दिली.

नेमकी कशामुळे ही दुर्घटना घडली ते अजून स्पष्ट झालेले नाही. वैमानिकाने हवाई सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले का ? त्यादृष्टीनेही समिती तपास करणार आहे. बचावलेल्या प्रवाशांनी खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.