मध्य नायजेरियातील आलिशान मुस्लिम रेस्टॉरंटमध्ये व एका मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ४४ जण ठार झाल्याची माहिती आपत्कालीन मदत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नायजेरियातील जॉस या मध्यवर्ती शहरात हे दोन स्फोट झाले.राष्ट्रीय आपत्कालनी व्यवस्थापन संस्थेचे सदस्य अब्दुसलाम महंमद यांनी सांगितले की, एकूण ६७ जण या दोन बॉम्बस्फोटात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, यांताया मशिदीत धर्मगुरू रमझाननिमित्त शांततामय सहजीवनाची शिकवण देत असताना हा स्फोट झाला. शांगलिंकू या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट झाला. जॉस हे ठिकाण नायजेरियात उत्तरेकडील मुस्लीम व दक्षिणेकडील ख्रिश्चन बहुल भागांच्या दरम्यान असून तेथे यापूर्वीही बॉम्बस्फोट झालेले आहेत.