News Flash

करोनाविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी आंदोलक शस्त्रसज्ज! ऑक्सिजन, सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध

दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलक करोनासंदर्भातली सर्व काळजी घेत आहेत.

देशात सध्या करोनाच्या लाटेचा कहर सुरु आहे. मात्र, तरीही दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. या शेतकरी आंदोलकांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठीची पूर्ण तयारी केली आहे. करोना प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी अनेक शेतकरी संघटनांच्या प्रमुखांनी पुढाकार घेत तयारी केली आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार करोना नियमांचं पालन कऱण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, त्यासोबतच ऑक्सिजन सिलेंडर्स, कॉन्सन्ट्रेटर्स यांचीही सोय करण्यात आलेली आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या बलजीत कौर सांगतात, “आधी भाषणांमधून तीन शेतकरी कायदे यांच्याविषयीच बोललं जायचं. मात्र, आता जे कोणी भाषणासाठी येतात, मग ते शेतकरी संघटनेचे नेते जरी असतील तरी ते करोनाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचं आवाहन करत असतात. त्याचबरोबर, मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर अशा नियमांचं पालन कऱण्याबाबत वारंवार ,सूचना करत असतात. ”

शेतकऱ्यांचे नेते आणि आंदोलक जगसीर सिंग सांगतात, “आम्हाला वारंवरा गरम पाणी पिण्यास सांगितलं जातं. तसंच उपवास टाळा, आपला घसा कायम ओला ठेवा अशा सूचना दिल्या जातात. त्याचबरोबर चहा करताना आलं, दालचिनी, जिरे अशा पदार्थांचा वापर करण्याचं आवाहनही केलं जातं.”
अशा सूचना दिवसातून कमीतकमी ५ ते ६ वेळा करण्यात येतात असंही त्यांनी सांगितलं.

डॉ. दलेर सिंग मुलतानी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह

 

“जे कोणी आजारी पडतात त्यांना तात्काळ डॉक्टरांची एक टीम तपासते आणि त्यांना करोनाची लक्षणं तर नाहीत ना याची खातरजमा केली जाते, असंही एका आंदोलकाने सांगितलं. त्याचबरोबर आम्ही वारंवार डास मारण्यासाठी औषधं फवारतो, सॅनिटायझर फवाारतो त्यामुळेही काही लोक आजारी पडतात”, असंही त्याने सांगितलं.

या आंदोलनात डॉ. दलेर सिंग मुलतानी हे सर्जन आपल्या टीमसह सेवा बजावत आहेत. ते म्हणतात, “आम्ही आंदोलकांना करोनाच्या प्रसाराबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर आम्ही करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. आम्ही आपत्कालासाठी काही ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स यांचीही सोय करुन ठेवली आहे. पण अद्याप त्यांचा वापर करण्याची वेळ आलेली नाही. सर्व आंदोलक मास्क लावत आहेत, सुरक्षित अंतराचं पालन करत आहेत.”
टिकरी सीमेवरचे एक शेतकरी नेते म्हणतात, “आमचे नेते आम्हाला आता अधिक लोक आंदोलनासाठी न आणण्याचे आवाहन करत आहे. कारण करोनाची ही लाट प्राणघातक ठरत आहे. याआधी आंदोलनात ५०००० हून अधिक लोक सहभागी झाले होते. मात्र, आता ९ ते १० हजारांच्या वर ही संख्या जाऊ नये यासाठी आवाहन केलं जात आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 4:43 pm

Web Title: at protest sites farm unions get covid battle ready with team of doctors oxygen vsk 98
Next Stories
1 Covid-19 vaccine registration: लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या…
2 “आमच्या हेतूंविषयी काही राज्य तक्रार करतात, हे वेदनादायी आहे!” – Bharat Biotech
3 “युपीमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतायत, कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेले जातायत आणि योगी All Is Well म्हणतायत”
Just Now!
X