News Flash

गोळीबारात ८ आशियाई व्यक्तींचा मृत्यू; अमेरिकेत निषेध मोर्चे

सर्व वयाचे व वांशिक गटाचे लोक अटलांटा येथील लिबर्टी प्लाझा  चौकात एकत्र जमले होते.

अटलांटा : जॉर्जियात  एका  व्यक्तीने केलेल्या गोळीबारात आशियाई वंशाचे आठ जण मारले गेल्याच्या निषेधार्थ शिकागो, न्यूयॉर्क, पीट्सबर्ग येथे मोर्चे काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हा वंशवाद व एका विशिष्ट जमातीच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले.

सर्व वयाचे व वांशिक गटाचे लोक अटलांटा येथील लिबर्टी प्लाझा  चौकात एकत्र जमले होते. त्यांनी काही निशाणे फडकावून घोषणाबाजी केली. अटलांटा येथे अमेरिकी सिनेटर राफेल वॉर्नोक व जॉन ओसोफ तसेच जॉर्जियातील प्रतिनिधी बी नेग्वेन यांनी निषेध व्यक्त केला. वॉर्नोक यांनी म्हटले आहे, की आशियाई भगिनी या हल्लय़ात मारल्या गेल्या आहेत. आम्ही त्यांच्या या हत्येचा निषेध करीत आहोत.

रॉबर्ट अ‍ॅरोन यांनी सांगितले, की २१ वर्षीय श्वेतवर्णीय व्यक्तीने अटलांटामधील दोन स्पामध्ये गोळीबार केला होता. त्यात चार जण ठार झाले, तर मसाज पार्लरमध्ये गोळीबारात चार जण ठार झाले होते. मंगळवारी झालेल्या या घटनेत मारल्या गेलेल्या सहा महिला आशियाई वंशाच्या होत्या. आतापर्यंतच्या चौकशीत असे निष्पन्न झाले, की लाँग याने या लोकांना ठार केल्याची कबुली दिली आहे. त्यात वांशिक हेतू असल्याचा त्याने इन्कार केला. त्याने लैंगिकतेच्या  लालसेतून या महिलांना ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजून या हल्लय़ांमागील हेतू समजलेला नाही. जॉर्जियात गेल्याच वर्षी वर्णद्वेषमूलक गुन्ह्यंविरोधात कायदा करण्यात आला होता.

अटलांटा पार्क येथे शेकडो लोकांनी जमून मोर्चा काढला, ‘स्टॉप आशियन हेट’, ‘वुई आर व्हॉट अमेरिका लुकस् लाइक’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. पीटस्बर्ग येथील मोर्चातही शेकडो लोक सामील होते. सँड्रा ओह  यांनी लोकांशी समाजमाध्यमांवर संवाद साधला. शिकागो येथे तीनशे लोक एकत्र जमले होते, तर न्यूयॉर्क सिटी येथे शेकडो लोकांनी टाइम्स चौकापासून चायना टाऊनपर्यंत मोर्चा काढला .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 1:14 am

Web Title: atlanta shootings 8 asians killed in firing in georgia zws 70
Next Stories
1 ममतांना पराभव दिसू लागला – मोदी
2 मी गाढव! अधिकारी कुटुंबाला ओळखले नाही- ममता
3 ‘सीएए’ अंमबजावणीचे भाजपचे आश्वासन
Just Now!
X