News Flash

२२ कोटींची रोकड घेऊन पळालेल्या ड्रायव्हरला पकडण्यात यश

दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडून सर्व रोकड हस्तगत केली आहे.

अॅक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी घेण्यात आलेली २२.५ कोटी रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या गाडीच्या चालकाला पकडण्यात शुक्रवारी यश आले. दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडून सर्व रोकड हस्तगत केली आहे.
अॅक्सिस बॅंकेची रोकड दिल्लीतील विविध एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी एसआयएस कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. या कंपनीकडून रोकड वाहतूक केली जाते. गुरुवारी संध्याकाळी गाडीमध्ये ठेवण्यात आलेली २२.५ कोटी रूपयांची रोकड घेऊन गाडीचा चालक पसार झाला होता. चालकानेच रोकड पळविल्याने बॅंकेचे अधिकारी चक्रावले होते. यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली.
प्रदीप शुक्ला याला शुक्रवारी पहाटे दिल्लीजवळ अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशमधला राहणारा असून, काही दिवसांपूर्वीच तो एसआयएस कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 3:31 pm

Web Title: atm cash van driver fled away with rs 22 5 crore arrested
Next Stories
1 उत्तर कोरियात किम जोंग-उन यांच्या ‘अॅम्बिशिअस’ केशरचनेचे अनुकरण बंधनकारक
2 ब्रिटनमधील सुरक्षेसाठी आयसिसच्या तळांवर हल्ले गरजेचे – कॅमेरून
3 ‘धर्माच्या आधारावर दुजाभाव केला जाऊ नये हेच आंबेडकरांना अपेक्षित होते’
Just Now!
X