22 February 2019

News Flash

२८ दिवसांच्या अर्भकावर अत्याचार

या मुलीला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले

२८ दिवसांच्या अर्भकावर अत्याचार करण्याची विकृत घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील आसीफ नागला येथे घडली. हे विकृत कृत्य केल्याचा आरोप असणाऱ्या नामिनो या २५ वर्षीय युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या बालिकेचे पालक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास घराबाहेर पडले होते. त्या वेळी या नराधमाने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज पांडे यांनी दिली. या मुलीला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिची अवस्था पाहून तिला दुसऱ्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिला.

First Published on December 7, 2015 2:03 am

Web Title: atrocity on 28 days child in up
टॅग Atrocity,Child,Up