News Flash

टय़ुनिशियातील हल्ला; ३० दहशतवाद्यांना अटक

त्याची डीएनए तपासणी करण्यात आली. तो टय़ुनिसमधील कामगार वस्तीत राहणारा होता.

| November 28, 2015 01:38 am

टय़ुनिशियातील अध्यक्षीय रक्षकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणानंतर अधिकाऱ्यांनी दहशतवादी गटांशी संबंधित तीस संशयितांना अटक केली आहे. अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की न्यायवैद्यक पोलिसांनी हल्लखोराचे नाव होसम बेन हेदी बेन मिलेद अब्देल्ली असे असल्याचे म्हटले आहे. त्याची डीएनए तपासणी करण्यात आली. तो टय़ुनिसमधील कामगार वस्तीत राहणारा होता. आयासिसने मंगळवारच्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून टय़ुनिसच्या बस स्थानकावर १२ जण मारले गेले होते. दहशतवादी गटांशी संबंध असलेल्या ३० जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 1:38 am

Web Title: attack in tayunisiya 30 terrorists arrested
Next Stories
1 अग्नि १ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
2 मारन यांनी सीबीआयपुढे जबाबासाठी उपस्थित राहावे
3 सदानंद गौडा यांच्या बंगल्यास परवानगी नाकारणारा आदेश रद्दबातल
Just Now!
X