08 July 2020

News Flash

भाजप खासदार मनोज तिवारींवर हल्ला, थोडक्यात बचावले

पक्षाच्या एका बैठकीत ते बोलत असताना हा प्रकार घडला.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. शनिवारी बवाना येथे पक्षाच्या एका बैठकीत ते बोलत असताना हा प्रकार घडला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

बवाना येथील पोटनिवडणुकीसाठी आयोजित एका बैठकीत मनोज तिवारी मार्गदर्शन करत असताना हा हल्ला झाला. निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळे विरोधी पक्षाकडून हिंसाचाराचे मार्ग अवलंबले जात असल्याचा आरोप भाजप प्रवक्त्याने केला. या हल्ल्यात तिवारींना दुखापत झालेली नाही. ते थोडक्यात बचावले.

उपायुक्त ऋषिपाल सिंह म्हणाले, शनिवारी संध्याकाळी मनोज तिवारी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. तिवारी यांच्यावर दगड, लाकडाचे तुकडे फेकण्यात आली. त्यांच्याकडून याबाबत तक्रार आली. गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ फुटेजचा तपास केला जात आहे.

बवाना येथे दि. २३ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या मतदारसंघातील आमदार वेद प्रकाश यांनी आम आदमी पक्षाचा त्याग करत भाजपला जवळ केले आहे. भाजपकडूनच ते निवडणूक लढवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 10:00 am

Web Title: attack on delhi bjp president mp manoj tiwari
Next Stories
1 संयुक्त जनता दल ‘रालोआ’मध्ये
2 चीनच्या पक्षपाती व्यापार पद्धतींची अमेरिकेकडून चौकशी सुरू
3 अद्रमुकच्या विलीनीकरणावर दोन दिवसांत सकारात्मक घडामोडी
Just Now!
X