13 August 2020

News Flash

काबूलमध्ये गुरुद्वारावर हल्ला; २५ जण ठार

हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली.

संग्रहित छायाचित्र

 

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी शीख गुरुद्वारामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात २५ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली.

सशस्त्र आत्मघाती हल्लेखोरांनी काबूलच्या पीडी१ भागातील गुरुद्वारावर ७.४७ वाजता हल्ला केला. त्यात २५ जण ठार झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात सहा तास चकमक झाली. त्यात चार हल्लेखोर ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दिली. या गुरुद्वारातून महिला आणि मुलांसह ८० जणांना वाचविण्यात यश आले.

या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली. याआधीही आयसिसने शिखांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले होते. अफगाणिस्तानात दोन वर्षांपूर्वी आयसिसने  शिखांच्या मेळाव्यावर केलेल्या हल्ल्यात १९ जण ठार झाले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघारी घेण्याची ग्वाही देत तालिबानशी शांतता करार केला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे शांतता धोक्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:13 am

Web Title: attack on gurudwara kills 25 in kabul abn 97
Next Stories
1 भारतात प्रदीर्घकाळ निर्बंध लागू करणे अवघड
2 देशात कठोर उपाययोजनांची गरज
3 स्पेनमध्ये दिवसात सातशेहून अधिक बळी
Just Now!
X