News Flash

माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला राष्ट्रासाठी हानिकारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; करोना योद्धा म्हणून केलेल्या कामाचे कौतुक

प्रतिनिधिक फोटो

 

प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचा आत्मा आहेत. त्यामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर होणारा कोणताही हल्ला हा राष्ट्रीय स्वार्थासाठी हानिकारकच आहे, असे सांगत करोनाकाळात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी करोना योद्धा म्हणून केलेले काम हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने (पीसीआय) राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित वेबिनारच्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले. यावेळी मोदी म्हणाले की, करोनाचे जगासमोर फार मोठे संकट उभे आहे. संपूर्ण देश याच्याशी लढा देण्यासाठी उभा आहे. अशा काळातही १३० कोटी नागरिकांचे संयम हे कौतुक करावे असे आहे. अशा कठीणप्रसंगी या महासाथीविरुद्ध लढा देण्यासाठी आणि समाजामध्ये जनजागृती प्रसार माध्यमे कायम प्रोत्साहित करीत आहेत. आत्मनिर्भर भारत संकल्पना पुढे नेण्यासाठीही माध्यम भूमिका बजावत आहेत. समाजाच्या चांगल्या हितासाठी व बदल घडवून आणण्यासाठी प्रसारमाध्यमे कायमच अग्रेसर असतात. सरकारच्या विविध उपक्रमांना माध्यमांनी मदत केली असून स्वच्छ भारत सारख्या उपक्रमांना माध्यमांनी दिलेले प्रसिद्धी आपण स्वत: पाहिले आहे असेही मोदी म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देत सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

काही वृत्तवाहिन्यांद्वारे कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्सच्या (टीआरपी) छेडछाडीबाबत बोलताना जावडेकर म्हणाले की, मंत्रालयाने स्थापन केलेली समिती लवकरच या विषयावर आपला अहवाल सादर करेल. टीआरपीतील हेरफेर तपासण्यासाठी आणि या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक समिती गठित केली आहे. जो लवकरच आपला अहवाल देईल, असे ते म्हणाले. जावडेकर यांनी टीव्ही वाहिन्यांसाठी नियामक मंडळ नसल्याच्या मुद्यालाही स्पर्श करत त्यांच्यासाठी आचारसंहिता आणण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकेल असेही सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:00 am

Web Title: attack on media freedom is detrimental to the nation pm narendra modi abn 97
Next Stories
1 केवळ लशीमुळे करोनावर मात करणे शक्य नाही; WHO च्या प्रमुखांचा खळबळजनक दावा
2 करोनावरील लस ९४ टक्के प्रभावी; अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा
3 सुशीलकुमार मोदींना उपमुख्यमंत्री न बनवल्याबद्दल नितीश कुमार म्हणाले…
Just Now!
X