News Flash

दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब eBay वर विकण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी विक्री करणाऱ्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली

ऑनलाईन बाजारात काय विकल्या जाईल हे सांगता येत नाही. याआधी देखील आश्चर्य व्यत्त होणारे प्रकार घडले आहेत. यावेळी तर eBay वर चक्क बॉम्ब विकण्याचा प्रयत्न केला गेला. यूकेमधील एका धातू शोधकाला हॅम्पशायर, स्वेथलिंगमध्ये त्याच्या भावाच्या घराजवळ द्वितीय विश्वयुद्धातील बॉम्ब सापडला होता. त्याने eBay वर त्याची जाहिरात केली. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. तसेच बॉम्ब घेऊन जाण्यासाठी तेथील कुटुंबीयांना हलविण्यात आले होते.

तज्ञांनी इशारा देऊनही ५१ वर्षीय मार्क विल्यम्स यांनी ई-कॉमर्स वेबसाइटवर प्राणघातक शस्त्रे सूचीबद्ध केले होते. सोमवारी eBay वर बॉम्ब पाहिल्यावर मिलिटेरियाचे कलेक्टर रल्फ शेर्विन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. “डब्ल्यूडब्ल्यूआयआय जर्मन इन्सेन्डियरी बॉम्ब – अस्सल, अस्सल साऊथॅम्प्टन ब्लिट्ज. अट – वापरलेला” असा मथळा eBay वर या बॉम्बचा फोटोसोबत लिहिला होता.

त्यानंतर रल्फ शेर्विन यांनी विल्यम्स यांना तो बॉम्ब जिवंत असल्याचा मेसेज केला. त्यानंतर विल्यम्स यांनी तो धातूशोधक असल्याचे सांगितले. तसेच साउथॅम्प्टनमधील मुलांच्या खेळाच्या मैदानावर खोदकामात मिळाल्याचे सांगितले, अशी माहिती शेर्विनने डेली मेलला दिली आहे. तो बॉम्ब जिवंत असल्याचे शेर्विनने विल्यम्सला समजावून सांगितले. मात्र, त्याने दुर्लक्ष केले.

शेर्विनने त्याला बॉम्ब खाली ठेवून पोलिसांना कळविण्याचे सांगितेले. मात्र विल्यम्सने दुर्लक्ष केले आली आणि बॉम्बची विक्री सुरु ठेवली. त्यानंतर त्याने शेर्विनच्या मेसेजला उत्तर देणे बंद केले, त्यावेळी पोलिसांना संपर्क करण्यात आला.

शेर्विन म्हणाला, “मी हॅम्पशायर पोलिसांना कळविले. त्यानंतर मला समजले की त्यांनी ईबेशी संपर्क साधला, त्याचा पत्ता शोधला आणि त्याला ताब्यात घेतले. मी काही केले नसते तर मी स्वतःला कधीच क्षमा केली नसती.”

मंगळवारी पोलीस विल्यम्सच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी त्या जागेवर ५० मीटरची दोरी लावली आणि स्वेथलिंगमधील हेव्हनस्टोन वेच्या आसपासच्या कुटुंबांना घरातून बाहेर काढले. यावेळी प्राणघातक बॉम्ब नेण्यासाठी फायरमन आणि लष्कराची स्फोटक आयुध डिस्पोजल टीम त्यांच्यात सामील झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2021 10:59 am

Web Title: attempt to sell world war ii live bombs on ebay in uk srk 94
Next Stories
1 VIDEO: सुनियोजित लसीकरणाचा भारतीय अमेरिकन्सचा अनुभव
2 देशात करोनाबळी तीन लाखांच्या पार; २४ तासांत ४,४५४ रुग्णांनी गमावले प्राण
3 बिहार : करोना ऐन भरात असतानाही आरोग्य केंद्राची केली गोशाळा
Just Now!
X