News Flash

राजस्थान : खेड्यातील दारुच्या दुकानावर लागली तब्बल ५१० कोटींची बोली

दोन महिलांनी हे दुकान विकत घेतलं

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य़: पीटीआय)

राजस्थानमधील एका छोट्याश्या गावातील दारुचं दुकान सध्या राज्यभरामध्ये चर्चेत आहे. हे दुकान चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून त्याला काही शे कोटींची बोली लावण्यात आलीय. राजस्थानमधील हनुमानगढ येथील दारुच्या दुकानासाठी सकाळी ११ वाजता लिलाव सुरु झाला आणि तो तब्बल १२ तासांहून अधिक म्हणजेच मध्यरात्रीनंतरही सुरु होता. काही लांखांपासून सुरु झालेली ही बोली अगदी दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता म्हणजेच १५ तासांनंतर संपली.

७२ लाखांपासून या दारुच्या दुकानाचा लिलाव सुरु झाला. १५ तास चालेल्या या लिलावामध्ये प्रत्येकजण एकाहून एक वरचढ बोली लावत होता. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार अखेर या दुकानाला ५१० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आणि लिलाव पूर्ण झाला. होय तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण हे दुकान खरोखर ५१० कोटींना विकलं गेलं आहे. या दुकान एकाच कुटुंबातील दोन महिलांनी विकत घेतलं आहे. यापैकी एका महिलेचं नाव किरण कनवार आहे. सध्या राजस्थानमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून सामान्यपणे दारुच्या दुकानांचा लिलाव करण्यात येतो. याच लिलावाचा भाग म्हणून या दुकानावर बोली लावण्यात आली आणि त्याला तब्बल ५१० कोटींची किंमत मिळाली. एवढी मोठी किंमत या दुकानासाठी मिळेल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनाही वाटलं नव्हतं. त्यामुळे ही रक्कम ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

हा लिलाव संपल्यानंतर आका उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील हलचाली सुरु केल्या आहेत. कनवार कुटुंबियांना या दुकानाच्या किंमतीच्या दोन टक्के रक्कम तातडीने उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. मागील वर्षी या दुकानाला लिलावामध्ये ६५ लाखांची किंमत मिळाली होती म्हणून यंदा ७० लाखांपासून या दुकानाचा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राजस्थानमध्ये दारुच्या दुकांनांचा लिलाव ही समान्य गोष्ट आहे. सध्या व्ह्यच्यूअल बिडिंगच्या माध्यमातून सात हजार ६६५ ठिकाणी लिलाव सुरु आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही लिलाव पद्धत बंद केली होती. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही पद्धत पुन्हा सुरु केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 8:04 am

Web Title: auction of a liquor store in rajasthan began at rs 72 lakhs ended at rs 510 crores scsg 91
Next Stories
1 भारतीय परंपरेला धर्मनिरपेक्षतेचा धोका-आदित्यनाथ
2 प. बंगालमध्ये परिवर्तन- मोदी
3 तमिळनाडूत रालोआ सरकार – अमित शहा
Just Now!
X