11 August 2020

News Flash

आँग सान स्यू की म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री

ध्यक्ष च्यॉ यांनी १८ मंत्र्यांच्या नावाची यादी सोमवारी नायपिताँ येथे कायदेमंडळाला सादर केली.

म्यानमारमध्ये नवीन अध्यक्ष उ तिन च्यॉ यांनी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आँग सान स्यू की यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे ठरवले आहे. ताज्या वृत्तानुसार त्यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आल्याचे समजते.
सभापतींनी सहा जणांची नावे वाचून दाखवली त्यात त्या एकमेव महिला आहेत. अध्यक्ष च्यॉ यांनी १८ मंत्र्यांच्या नावाची यादी सोमवारी नायपिताँ येथे कायदेमंडळाला सादर केली. यादीत आँग सान स्यू की यांचा समावेश आहे. स्यू की यांची मुले ब्रिटिश असल्याने त्यांना अध्यक्षपद मिळू शकले नाही. गेल्या नोव्हेंबरमधील निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठे यश संपादन केले होते.
उतिन च्या यांनी दिलेल्या यादीवर आता तेथील संसदेत विचार केला जाईल, त्यानंतर बुधवारी मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील. जर एखाद्या प्रतिनिधीने असहमती दाखवली, तर त्याचा फेरविचार करावा लागेल. आँग सान स्यू की या पहिल्या परराष्ट्रमंत्री असतील अशी अटकळ आहे पण त्यांनी मंत्रिपद स्वीकारले तर त्यांना पक्षाचे काम बंद करावे लागेल व संसद सदस्यत्वही सोडावे लागेल. आँग सान स्यू की या पद स्वीकारतील की नाही याबाबत साशंकता वाटते, असे राजकीय तज्ज्ञ च्याँ लायगन यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री पद घेतले तर त्यांना जगातील देशांना भेटी देणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांचे पक्षावरील नियंत्रण कमी होऊ शकते. त्यांच्या मुलांचे नागरिकत्व ब्रिटिश असल्याने त्यांना अध्यक्षपद स्वीकारता येत नाही. आँग सान स्यू की यांना लष्कराशी चांगले संबंध ठेवावे लागतील व नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी नेत्यांशी जुळवून घ्यावे लागेल. अजूनही तेथे लष्कराचेच वर्चस्व असून २५ टक्के जागा लष्करासाठी राखीव आहेत. त्या जागा माजी सैनिकांना निवडून न येता बहाल केल्या जातात. त्यामुळे गृह, सीमा सुरक्षा व संरक्षण या तीन खात्यांवर अजूनही लष्करचेच नियंत्रण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 2:32 am

Web Title: aung san suu kyi myanmars foreign minister
Next Stories
1 जनुकीय संपादनाने मानवी पेशीतील एचआयव्ही विषाणू काढण्यात यश
2 पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत बांधील -राष्ट्रपती
3 ओबामा-कॅस्ट्रो यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतभेदाचे दर्शन
Just Now!
X