26 February 2021

News Flash

VIDEO : नवजात बालकाला तिस-या मजल्यावरून दिले फेकून

इर्षेने बालकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला

कानपूरच्या एका रुग्णालयात काळजाचे तुकडे करणारा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. कानपूरमधल्या एका रुग्णालयात एका महिलेने १८ दिवसांच्या नवजात बालकाला तिस-या मजल्यावरून खाली फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पण सुदैवाने मात्र हे नवजात बालक जिवंत आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते आहे.
या बालकाला कपड्यात गुंडाळून महिलेने तिस-या मजल्यावर आणले. कोणी बघत नाही याची खात्री करून घेताच त्याला तिस-या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यानंतर कोणालाही शंका येऊ नये म्हणून टॉवेलचा तिने गोळा केला आणि त्याला कुशीत घेऊन ती खाली गेली. पण तिचे हे दृष्टकृत्ये कॅमेरात कैद झाले हे मात्र या महिलेला समजले नाही. काही स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार या महिलेला तीन मुली आहेत. तिच्या जावेला मात्र मुलगा झाला. त्यामुळे घरात तिचा मान कमी झाला. त्यातून निर्माण झालेल्या इर्षेने या महिलेने  बालकाचा जीव घेण्याच्या प्रयत्न केल्याचे समजते. मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 12:18 pm

Web Title: aunt throws 18 day old infant from 3rd floor of hospital building in kanpur
Next Stories
1 अरविंद केजरीवालांच्या घशावर शस्त्रक्रिया होणार
2 भाजप-पीडीपी युती अपयशी, काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज; सुब्रमण्यम स्वामींचा टोला
3 अरविंद केजरीवालांकडून अपेक्षाभंग, अण्णा हजारे दुःखी
Just Now!
X