05 March 2021

News Flash

ऑस्ट्रेलिया फेसबुक प्रकरणातील तिढा सुटणार?

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांचे पेजेस फेसबुकवर पुन्हा दिसणार

संग्रहित छायाचित्र

बातम्यांसाठी शुल्क आकारण्याच्या आपल्या नव्या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवल्यानंतर अखेर फेसबुकनेही नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने फेसबुक आणि गुगलकडे ऑस्ट्रेलियातील बातम्यांसाठी शुल्क आकारण्याच्या नवा कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे फेसबुक आता ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रे दाखविण्यास सुरूवात करेल, असे कोषाध्यक्ष जोश फ्रायडनबर्ग यांनी मंगळवारी सांगितले.

हे प्रकरण एवढं वाढलं होतं की, फेसबुकने ऑस्ट्रेलियामधील आपले पेज देखील बंद केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियामधील युजर्सना फेसबुकच्या माध्यमातून न्यूज पोस्ट बघता किंवा शेअरही करता येत नव्हत्या. फेसबुकच्या या निर्णयाचा फटका हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना बसला होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या युजर्ससोबतच ऑस्ट्रेलियाबाहेर असलेल्यांनाही फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातम्या वाचता येत नव्हत्या.

FB चा मोठा दणका; ऑस्‍ट्रेलियात न्‍यूज सर्व्हिस केली बॅन, स्वतःचं पेजही केलं ब्‍लॉक

“आम्हाला खात्री आहे की ऑस्ट्रेलियन सरकारने बर्‍याच बदलांवर सहमती दर्शविली आहे आणि आम्ही हमी देतो की आम्हाला त्यांच्याकडून मिळणाऱ्या मूल्यांच्या तुलनेत प्रकाशकांना दिले जाणारे मूल्य याची जाण ठेवू”, असे फेसबुकने सांगितले आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 1:48 pm

Web Title: australian government agrees to amend media law facebook to restore australian news pages sbi 84
Next Stories
1 गुजरात महापालिका निवडणूक : ‘आप’ची सूरतमध्ये एन्ट्री तर ओवेसींच्या पक्षालाही यश; भाजपा सुसाट, काँग्रेसला फटका
2 दिल्ली : २६ जानेवारी हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपी अटकेत
3 सीमावाद मागे सोडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता
Just Now!
X