दक्षिण चीन सागरात अस्थिरता निर्माण करणाऱ्या चीनच्या हालचालींवर ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओफॅरेल यांनी टीका केला होती. त्यावर चीनचे भारतातील राजदूत सुन वेइडाँग यांनी हरकत घेतल्याने त्यांच्यावर ओफॅरेल यांनी हल्ला चढविला आहे.

या प्रदेशातील स्थिती एकतर्फी बदलणारी कृती चीनने टाळली पाहिजे, असे ओफॅरेल यांनी म्हटले आहे.

दक्षिण चीन सागरातील चीनची कृती अस्थिरता निर्माण करणारी आणि तणाव वाढविणारी असल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला चिंता वाटत असल्याचे गुरुवारी ओफॅरेल यांनी म्हटले होते. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला दक्षिण चीन सागर हा महत्त्वाचा सागरी मार्गही आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

ओफॅरेल यांच्या वक्तव्याला वेइडाँग यांनी ट्वीट करून हरकत घेताना वक्तव्ये वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मत व्यक्त केले. त्याला प्रत्युत्तर देताना ओफॅरेल यांनी, द हेगमधील न्यायालयाने चीनने दक्षिण चीन सागरावर केलेला सार्वभौमत्वाचा दावा फेटाळल्याचे स्पष्ट केले.