मेलबर्न : भारतातील व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी करण्यात आली असून जे ऑस्ट्रेलियन लोक भारतातून परत येतील त्यांना  तुरुंगात टाकून दंडही केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समर्थन केले.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने म्हटले आहे की,  देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देशाच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याची वेळ आली आहे.  जर भारतीय व्यक्ती १४ दिवस मायदेशी राहिली तर त्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार नाही. सरकारने या लोकांवर खटले भरून पाच वर्षे तुरुंगवासात टाकण्याचा इशारा दिला आहे तसेच ६६ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे ५०८९९ अमेरिकी डॉलर्स दंड करण्यात येणार आहे.

मॉरिसन यांनी सांगितले की, ही प्रवेशबंदी तात्पुरती आहे. ऑस्ट्रेलियात कोविडची तिसरी लाट येऊ नये यासाठी ही  उपाययोजना गरजेची आहे.  भारतीय व्यक्तींना हा निर्णय भयानक वाटणे साहजिक आहे पण हॉवर्ड स्प्रिंग्ज केंद्रात रुग्णांची संख्या सात पटींनी वाढली असून ते लोक भारतातून परत आलेले आहेत.