News Flash

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पुढील आठवडय़ात भारतात

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट पुढील आठवडय़ात प्रथमच भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी सामरिक भागीदारी व व्यापार-गुंतवणूक या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे.

| August 31, 2014 03:22 am

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट पुढील आठवडय़ात प्रथमच भारत दौऱ्यावर येत असून त्यावेळी सामरिक भागीदारी व व्यापार-गुंतवणूक या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. भारताला युरेनियम पुरवठा सुरू करण्याच्या करारावरही यावेळी स्वाक्षऱ्या होणार आहेत.
अ‍ॅबॉट यांनी सांगितले की, आपण ४ सप्टेंबरला भारत व मलेशियाच्या दौऱ्यावर जात आहोत. नवी दिल्ली व मुंबई या दोन शहरांना आपण भेट देऊ. दोन्ही देशातील व्यापारी संबंध मजबूत करणे हा या भेटीचा हेतू आहे. दोन्ही देशात आर्थिक व व्यापारी संबंध चांगले असून भारत हा ऑस्ट्रेलियासाठी तिसरी मोठी निर्यात बाजारपेठ आहे. एकूण ११.४ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात आमच्याकडून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:22 am

Web Title: australian pm to visit india next week
Next Stories
1 दुष्काळात चांगले उत्पादन देणाऱ्या वनस्पतींच्या निर्मितीसाठी नवीन जनुकाचा शोध
2 न्यूझीलंडच्या न्याय मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांचा राजीनामा
3 लिबियात नामधारी सरकारचे पंतप्रधान अब्दुल्ला थानी यांचा राजीनामा
Just Now!
X