ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी रविवारी आपले ‘चांगले मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियामधील हिंदू समुदायाला रंगांचा उत्सव असलेल्या होळीच्या शुभेच्छा दिल्या. “आमच्या हिंदु ऑस्ट्रेलियन समुदायाला, माझे चांगले मित्र असलेल्या नरेंद्र मोदी यांनाआणि जे लोक हा सण साजरा करीत आहेत अशा सर्वांना आनंदी आणि रंगीबेरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा!” असे मॉरिसनने ट्विटरवर पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन नेत्याने व्हिडिओ संदेशासह त्यांच्या शुभेच्छा ट्वीट केल्या आणि हिंदीमध्ये ‘होली की शुभकामनाये’ असेही लिहिले.

“रंगांचा अद्भुत उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकास नमस्ते आणि हॅप्पी होळी. मागील वर्षी, होळीचा रंग, आपला उत्साह आणि आपले जीवन हे सर्व साथीच्या रोगाने व्यापले होते. त्या कठीण दिवसांमुळे होळीचा आनंद आपल्या जीवनातून निघून गेला होता. अजूनही आपण जे काही करतो आहे त्यावर या रोगाचे सावट आहे, परंतु यावर्षी आपण आपले डोळे उंच करून मोठ्या आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहू शकतो,” मॉरिसन म्हणाले.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

मॉरिसन यांनी भारताचे कौतुक करत असे सांगितले की, हा देश लसी बनविण्याचे ‘जबरदस्त काम’ करीत आहे आणि संपूर्ण जगाला व्यापकपणे मदत करत आहे. चतुष्पक्ष सुरक्षा संवाद ज्यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील अनौपचारिक सामरिक संवादात भारताने मुख्य भूमिका नोंदवली आहे. “आपण एकत्रितपणे पुढे जाण्याचा मार्ग शोधत राहू … ऐक्याच्या भावनेने, होळीच्या हार्दिक शुभेच्छा,” असे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड – १९ आजाराची प्रकरणे देशात वाढत आहेत याच पार्श्वभूमीवर भारतभर रविवारी होळी साजरी करण्यात येणार असून अनेक राज्यांनी लोकांना आपल्या घरातील लोकांसह हा सण आपल्या घरात साजरा करावा आणि गर्दी टाळावी असे सांगितले आहे.