27 February 2021

News Flash

रिक्षा चालकाने १७ वर्षाच्या मुलीला घरी नेऊन केला बलात्कार

फॅक्टरीतून सुटल्यावर घरी निघालेल्या एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

फॅक्टरीतून सुटल्यावर घरी निघालेल्या एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली आहे. फॅक्टरीतून सुटल्यावर पीडित तरुणीने घरी जाण्यासाठी रात्री ११ च्या सुमारास गाझियाबाद येथील जुन्या बस स्टँडवरुन शेअर रिक्षा पकडली. रिक्षा चालकाने त्या मुलीला घरी सोडणे अपेक्षित होते. पण रिक्षा चालक त्या तरुणीला गरीमा गार्डन शाहीबाबाद येथे एका घरात घेऊन गेला तिथे त्याने व त्याच्या साथीदाराने मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी रवी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले कि, मी आरोपींपैकी कोणालाही ओळखत नाही. मी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी असताना रिक्षा चालक तिथे आला व त्याने मला घरी सोडतो सांगून रिक्षात बसण्यास सांगितले. त्याने गल्ली-बोळातून रिक्षा फिरवली. रिक्षा चालवतानाच त्याने त्याच्या मित्राला फोन लावून बोलावून घेतले. रिक्षा चालक मला एका रुमवर घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या साथीदाराने माझ्यावर सामूहिक बलात्कार केला.

घटनेनंतर मीच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घडल्या प्रकाराची माहिती दिली असे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले. आयपीसीच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ऑटो चालक आणि त्याच्या साथीदाराने रवीच्या भाडयाच्या घरात बलात्कार केला. ऑटो चालकाला आपण पंडित या नावाने ओळखत असल्याने रवीने पोलीस चौकशीत सांगितले. पंडित सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पंडितची बहिण गरीमा गार्डन भागात राहते. तिची चौकशी केल्यानंतर अधिक माहिती मिळू शकते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:57 pm

Web Title: auto driver raped girl
Next Stories
1 सीता हे टेस्ट ट्यूब बेबीचे अपत्य; भाजपा नेत्याची मुक्ताफळे
2 उडी मारताना अंदाज चुकला आणि शरीरात घुसला लोखंडी गेट
3 मसाज पार्लरच्या नावे सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी तरुणींना भारताबाहेर हाकललं
Just Now!
X