News Flash

Semiconductor crisis: मारुतिचं उत्पादन चिप शॉर्टेजमुळे अर्ध्यावर

मोठ्या प्रमाणावर कार उत्पादक या चिप्सवर अधिकाधिक अवलंबून आहेत.

Semiconductor crisis: मारुतिचं उत्पादन चिप शॉर्टेजमुळे अर्ध्यावर

चिपच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये गाड्यांचं उत्पादन 60% ने कमी होईल आणि महत्त्वाच्या भागांच्या कमतरतेमुळे जगातल्या सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांना फटका बसेल, असा इशारा भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुति सुझुकीने मंगळवारी दिला आहे.

मारुतिच्या उत्पादनावरील परिणाम काही अंशी ऑगस्टमध्येच दिसून आला होता. परंतु, सप्टेंबरमध्ये हरियाणा आणि गुजरात राज्यांमध्ये त्याच्या संयंत्रांमधील उत्पादन कपात दाखवते की जपानी वाहन निर्माता सुझुकी लिमिटेडच्या प्रमुख शाखांसाठी समस्या तीव्र होत आहे. दोन कारखान्यांमध्ये सप्टेंबरमध्ये एकूण उत्पादनाचे प्रमाण सामान्य उत्पादनाच्या सुमारे ४०% असू शकते, असे मारुतिने नियामक दाखल करताना सांगितले. कंपनीने जुलैमध्ये १ लाख ७० हजार ७१९ आणि जूनमध्ये १ लाख ६५ हजार ५७६ कारचे उत्पादन केले.

इंजिनच्या संगणकीय व्यवस्थापनासाठी, चांगल्या इंधन व्यवस्थापनासाठी आणि आपत्कालीन ब्रेकिंग सारख्या चालक -सहाय्यक वैशिष्ट्यांसाठी उत्पादक या चिप्सवर अधिकाधिक अवलंबून आहेत.परंतु साथीच्या काळात पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सची मागणी वाढली आहे कारण लोकांनी घरून काम केले ज्याचा फटका वाहन उत्पादकांना बसला.

कमतरतेला तोंड देत, अनेक वाहन उत्पादकांनी उच्च मार्जिन असलेल्या गाड्यांच्या मॉडेल्सच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि किंमती देखील वाढवल्या आहेत. मारुतिने या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. सप्टेंबरच्या नंतरही उत्पादनावर परिणाम होईल की नाही हे मारुतिने आपल्या निवेदनात सांगितले नाही. मारुति कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेचे संकट संपले नाही तर पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 10:22 am

Web Title: autos transportation indias maruti suzuki sees production slump chip shortage vsk 98
Next Stories
1 अमेरिकी लष्कराचं हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं; शोधमोहिम सुरू
2 मोदींनी मागवली रखडलेल्या विकासकामांची, प्रकल्पांची यादी; वाढत्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त करताना म्हणाले…
3 “तुमच्याकडे उत्तम सैन्य आहे, पण…”; अफगाणिस्तान सोडण्याआधी बायडेन आणि घनींची झालेली कॉलवर चर्चा
Just Now!
X