भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणार आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशी या महिला वैमानिकांची नावं आहेत. या तिघींनी आपलं प्रशिक्षण नुकतंच यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे.

अवनी आणि भावना मिग-२१ बिसन्स हे विमान उडवणार आहेत. मिग-२१ विमान हवेत उडवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येतं. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असतं. अवनी, भावना आणि मोहना या तिघींनी जून २०१६ पासून हे प्रशिक्षण घेतलं आहे.

Woman Drives Truck From Tamil Nadu to Bangladesh
ट्रकचं स्टिअरिंग तिच्या हाती; १० दिवस तमिळनाडू ते बांग्लादेश ट्रक चालवणारी ठरली पहिली महिला
UPSC third topper Ananya Reddy
पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

आतापर्यंत या तिघींनी पायलॅटस पीसी-७, टर्बोप्रॉप्स, किरण आणि हॉक जेट ट्रेनर्स अशी तुलनेनं हाताळायला सोपी विमानं चालवली आहेत. आता त्यांनी ३४० किमी प्रति तासांचं व्हर्च्युअल प्रशिक्षण घेतलं आहे. अवनीने  टु सिटर मिग-२१ टाइप ६९ ट्रेनर विमानात क्वालिफाइड फायटर इंस्ट्रक्टरसोबत प्रशिक्षण घेतलं आहे. मोहना अद्याप हॉक अॅडव्हान्स्ड जेटचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली. या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास १५ कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिला मिग-२१ बिसन्स हे विमान उडवणार आहेत पण, त्या महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं झुकतं माप देण्यात आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.