News Flash

जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील कारवाईत यश

संग्रहीत

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसासंह 42-आरआर आणि सीआरपीएफ-130 बटालयिनच्या तुकडीने केलेल्या संयुक्त कारवाईत, आज जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलं आहे.

अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच, जैश-ए-मोहम्मद संघटनेला संवेदनशील माहिती देखील ते पुरवत होते.

दरम्यान, या अगोदर दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती.

लख्वी हा २०१५ मध्ये मुंबई हल्ला प्रकरणात जामिनावर सुटला होता. दहशतवादविरोधी विभागाने पंजाबमध्ये गुप्तचरांच्या मार्फत मोहीम राबवली होती. त्यात लख्वी हा दहशतवादाला अर्थपुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 3:41 pm

Web Title: awantipora police along with 42 rr and 130 bn crpf arrested 2 terrorist associates of jaish e mohammad from awantipora msr 87
Next Stories
1 उत्तर प्रदेशातील रुग्णालयामध्ये कुत्र्याची पिल्लं जन्माला येतात असं म्हणणाऱ्या ‘आप’च्या आमदाराला अटक
2 पंतप्रधान निधीतून भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना दोन लाखांची मदत जाहीर
3 देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्यांची संख्या पोहोचली ९६ वर – आरोग्य मंत्रालय
Just Now!
X