News Flash

हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन हस्तकांना अटक

दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्र पुरवण्यामध्ये होता सहभाग

संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा पोलिसांना आज हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी निगडीत असलेल्या तीन जणांना अटक करण्यात यश आले आहे. येथील त्राल भागात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्र पुरवणे व अन्य प्रकारची मदत करण्यात यांचा सहभाग आहे.

दरम्यान आज जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन भागामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या मध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

या अगोदर मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत जवानांना हिजबुलच्या एका दहशतवाद्यास पकडण्यात यश आलं होतं. विशेष, म्हणजे यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 3:09 pm

Web Title: awantipora police has arrested 3 associates of proscribed terror outfit hizb ul mujhdeen msr 87
Next Stories
1 “माझ्याकडे जन्माचा दाखला नाही तर मी जीव देऊ का?”; मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल
2 7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक भत्त्याचे नियम काय?
3 जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X