पाकिस्तान लष्कराकडून आठ जानेवारी रोजी भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले दोन भाकतीयसैनिक, हेमराज आणि सुधाकर सिंह यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारमार्फत घेण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी होणा-या लष्करीसंचलन कार्यक्रमात या दोन्ही शहीदांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतासोबत शस्त्रसंधीचा करार झालेला असतानाही पाकिस्तनी लष्कराकडून वारंवार त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणारी ही आगळीक अस्वीकारार्ह असून त्यांची अरेरावी न थांबल्यास भारताला या प्रकरणी पूर्णपणे नव्याने वेगळा पर्याय शोधावा लागेल,अशा शब्दात भारतीय वायू दलाचे प्रमुख मार्शल एन.ए.के ब्राऊन यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे