गेली काही वर्षे सातत्याने टेलर स्वीफ्ट, लेडी गागा, अडेल या गायिकांचे महिलाराज मिरवणारा ग्रॅमी सोहळा यंदा मात्र पुरुष गायकांनी गाजविला. ब्रिटिश फोक-रॉक संगीत सादर करणारा ‘ममफर्ड अॅण्ड सन्स’, ब्लू-रॉक बँड ‘ब्लॅक कीज’ आणि पॉप संगीत सादर करणारा बँड ‘फन’ या पुरुष सदस्यांच्या बँडनी ग्रॅमीतल्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरले. ‘बॅबल’ या ममफर्ड अॅण्ड सन्सच्या अल्बमला ‘अल्बम ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला. ‘वी आर यंग’ या गाण्यासह फन या बँडने नव्या कलाकारांसाठी दिला जाणारा ‘बेस्ट न्यू आर्टिस्ट’चा पुरस्कार पटकावला. बेल्जियन-ऑस्ट्रेलियन गायक गोटिये आणि आर अॅण्ड बी गायक फ्रँक ओशन यांनीही महत्त्वपूर्ण पुरस्कार पटकावले.
दिवंगत सतार सम्राट रविशंकर यांना वर्ल्ड म्युझिक अल्बमसाठी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांची मुलगी अनुष्का शंकर यांनी हा पुरस्कार घेतला. रविवारी त्यांना ग्रॅमीतर्फे मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. रविशंकर यांचा ‘द लिव्हिंग रूम सेशन पार्ट १’ हा अल्बम यंदा अनुष्का शंकर यांच्या ट्रॅव्हलर अल्बमसह वर्ल्ड म्युझिक अल्बमच्या नामांकन गटामध्ये होता.
दिवंगत सतार सम्राट रविशंकर यांना वर्ल्ड म्युझिक अल्बमसाठी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांची मुलगी अनुष्का शंकर यांनी हा पुरस्कार घेतला. रविवारी त्यांना ग्रॅमीतर्फे मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.