21 January 2019

News Flash

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा होणार पायउतार

अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपलं पद सोडणार आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपलं पद सोडणार आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कार्यकाळ संपण्यासाठी अडीच वर्ष शिल्लक असतानाही त्यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा शिखा शर्मा यांची नियुक्ती करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा निर्णय आला आहे. आपला तीन वर्षांचा कार्यकाळ कमी करुन फक्त सात महिने करण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

जुलै २०१८ पासून त्यांची चौथ्यांदा नियुक्ती होणार होती. ८ डिसेंबर २०१७ रोजी बोर्डाने आरबीआयला शिखा शर्मा यांची १ जून २०१८ पासून पुन्हा एकदा पुढील तीन वर्षांसाठी एमडी आणि सीईओपदी नियुक्ती करत असल्याचं कळवलं होतं. शिखा शर्मा २००९ पासून अॅक्सिस बँकेच्या सीईओपदी असून आर्थिक क्षेत्रात इतकी वर्ष सीईओपद सांभाळणा-या त्या एकमेव महिला आहेत.

आश्चर्य म्हणजे, अॅक्सिस बँकेने सोमवारी धक्कादायक खुलासा करत शिखा शर्मा यांनीच बोर्डाला आपली पुन्हा एकदा एमडी आणि सीईओपदी नियुक्ती करण्यासाठी विचार केला जावा अशी विनंती केल्याचं सांगितलं.

First Published on April 10, 2018 5:15 am

Web Title: axis bank ceo shikha sharma to cut tenure by 30 months