News Flash

कोरिया आणि अयोध्येचं आहे विशेष नातं ; कोरियन राजदूतानेच केला खुलासा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही या संबंधांवर प्रकाश टाकण्यासंदर्भात केले होते प्रयत्न

(Photo: Twitter/@IndiainROK)

दक्षिण कोरियाचे राजदूत शिन बोंग-किल यांनी अयोध्येसंदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केलं आहे. बोंग-किल यांनी अयोध्या आणि कोरियाचे ऐतिहासिक नातं असल्याचा संदर्भा दिला आहे. कोरियामधील एका प्राचीन ऐतिहासिक पुस्तकामध्ये अयोध्येमधील एका राजकुमारीने कोरियामधील राजा किम सुरो याच्याशी लग्न केलं होतं, असा उल्लेख सापडतो असं म्हटलं आहे. या राज्याच्या थडक्यामध्ये पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनामध्ये अयोध्येशी संबंधित कलाकृती सापडल्याचेही बोंग-किल यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की पाहा >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

इसवी सन ४८ मध्ये अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न ही कोरियामध्ये गेली होती. येथील राजकुमार किम सूरो याच्याशी लग्न केल्यानंतर सुरीरत्न हे नाव बदलून तिचे नाव हवांग ओके ठेवण्यात आलं. सुरीरत्न ही समुद्र मार्गाने कोरियाला गेली होती. अयोध्येमधून निघताना सुरीरत्नने स्वत:बरोबर एक मोठी शिळा (दगड) नेली होती. समुद्रामध्ये नाव स्थीर रहावी म्हणून सुरीरत्न हा मोठा दगड घेऊन गेली होती असं सांगण्यात येतं. हा दगड नंतर तिच्या पगोडामध्ये स्मृतीचिन्ह म्हणून जपून ठेवण्यात आल्याचे अख्यायिका आहे.

काशी हिंदू  विश्वविद्यालयामधील इतिहास विभागाचे प्राध्यापक अतुल कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी कथांमध्येही याचा उल्लेख सापडतो. चिनी कथांनुसार अयोध्येच्या राजाला रात्री स्वप्न पडले ज्यामध्ये त्याला राजकुमारीचे लग्न कोरियाच्या राजकुमाराशी करण्यासंदर्भातील संकेत मिळाले. हवांग ओके आणि किमसूरो दोघे दिडशे वर्ष जगल्याचे सांगितले जाते. हे दोघेही दक्षिण कोरियामधील प्रमुख राजा-राणी मानले जातात. असं म्हणतात की या देशातील १० टक्के लोकसंख्याचे मूळ वंशज हे दोघे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दोघांना दक्षिण कोरियामध्ये विशेष महत्व आहे.

नक्की वाचा >> भाजपाचा फायर ब्रॅण्ड नेता म्हणतो, “मिशन अयोध्या पूर्ण झालं, आता लक्ष्य…”

भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना २००१ साली अयोध्या आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील संबंधांचा शोध घेण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. या दोन्ही ठिकाणांमधील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकून त्याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा वाजपेयी यांचा हेतू होता. भारतामधूनच बौद्ध धर्माचा कोरियामध्ये प्रसार झाला असं प्राध्यापक त्रिपाठी सांगतात. एकमेकांपासून चार हजार ३०० किमीवर असणाऱ्या कोरिया आणि भारत या देशांमध्ये प्राचीन काळापासून संबंध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 10:02 am

Web Title: ayodhya has important relations with korea scsg 91
Next Stories
1 राम मंदिर भूमिपूजन : असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम
2 कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना करोनाची लागण
3 भाजपाचा फायर ब्रॅण्ड नेता म्हणतो, “मिशन अयोध्या पूर्ण झालं, आता लक्ष्य…”
Just Now!
X