News Flash

राममंदिर ट्रस्टचे प्रमुखपद मोहन भागवतांना द्यावे- महंत परमहंस

राष्ट्र निर्माण व मंदिर उभारणी यापैकी कुठलाही विषय असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यात खेडय़ापासून शहरापर्यंत जे काम केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

 

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या ट्रस्टच्या (विश्वस्त संस्था) प्रमुखपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नेमणूक करण्याची सूचना अयोध्येतील तपस्वीजी की छावणीचे महंमत परमहंसजी महाराज यांनी सोमवारी केली.

सीतासमाहित स्थळ येथे त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, सरसंघचालक हे अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पदसिद्ध प्रमुख असले पाहिजेत. राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी संघ परिवारास देण्यात यावी.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निकालात असे म्हटले होते की, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर रामलल्ला विराजमानचा हक्क असून ती जागा राममंदिर उभारणीसाठी देण्यात येत आहे तर मशिदीसाठी सरकारने दुसरी पाच एकर जागा अयोध्येत मध्यवर्ती ठिकाणी द्यावी.

राष्ट्र निर्माण व मंदिर उभारणी यापैकी कुठलाही विषय असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यात खेडय़ापासून शहरापर्यंत जे काम केले आहे तसे कुणी करू शकत नाही, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री हे सर्वच मूळ संघाचे आहेत असे सांगून ते म्हणाले की, ‘रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख नृत्यगोपाल दास व सदस्य रामविलास वेदांती हे दोघेही संकुचित मनोवृत्तीचे आहेत.’ सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास सांगितले असताना रामजन्मभूमी न्यासाने राममंदिर उभारण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असे सूतोवाच केले. त्याचप्रमाणे रामविलास वेदांती यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना विरोध करून नाथ संप्रदायाला मंदिर बांधण्याचा अधिकार नाही असे वक्तव्य केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:49 am

Web Title: ayodhya ram mandir mohan bhagwat akp 94
Next Stories
1 केरळमध्ये घातपाताचा कट : ६ दहशतवादी दोषी
2 अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी
3 लोकसभेत धक्काबुक्की
Just Now!
X