News Flash

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमी परिसरात भक्तांना बंदी

उत्तर प्रदेशात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ

देशात करोना प्रकोपामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती उद्धभवली आहे. दिल्ली ६ दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना फैलाव पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

‘करोनाच्या वाढत्या फैलावामुळे श्री राम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल.’, असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून ट्विटरवर सांगण्यात आलं आहे.

राम जन्मभूमीत रामनवमीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अयोध्या नगरीला आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिर परिसर फुलांनी सजवला जातो. या सोहळ्याला भक्तही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र करोनामुळे अयोध्येत भक्तांना परवानगी नाकारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अयोध्येतील यात्राही रद्द करण्यात आली आहे. साधुसंत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तांना अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. अयोध्येतील संत समाजाने नागरिकांना घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 7:16 pm

Web Title: ayodhya ramnavami festival bhakt will no allowed due corona virus spread rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 UP सरकारला न्यायालयाचा दणका; ५ मोठ्या शहरांमध्ये २६ एप्रिलपर्यंत सक्तीचा लॉकडाउन लागू करण्याचे आदेश
2 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग करोना पॉझिटिव्ह
3 मंगळ ग्रहावर नासाच्या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण
Just Now!
X