आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना यापुढे अॅलोपॅथी उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथीचे उपचार करण्यास हिरवा कंदील दाखविला. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परवानगीशिवाय आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथीचे उपचार करता येणार नाही, असा आक्षेप याचिकेमध्ये नोंदविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील ९५ हजार आयुर्वेदिक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.