केंद्र सरकारची महत्त्वांकाक्षी ‘आयुष्मान भारत’ योजनेचा अनेक गोरगरिबांना रुग्णांना फायदा झाला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत दहा लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे गरिबांचे तीन हजार कोटी रूपये वाचल्याचा दावा पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना केला आहे. मोदी सरकारनं स्वास्थ्य क्षेत्रात अभूतपूर्व विकास केला आहे. आम्ही देशातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना ‘आयुष्यमान भारत’ गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्याद्वारे ५० कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था केल्याचा दावा पियुष गोयल यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल सरकारचा अंतरिम बजेट सादर करत आहेत. यामध्ये मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपा सरकारने सर्वसमावेक्षक अर्थसंकल्प सादर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून औषधांच्या किमतीमध्ये कपात झाली आहे. त्याचा फायदाही गरबांना मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने औषध दुकानातून रुग्णांना स्वस्त औषधं उपलब्ध करून दिली आहेत.