04 March 2021

News Flash

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर आझम खान यांनी मागितली माफी

आझम खान यांनी देशातल्या सगळ्या स्त्रियांचा अपमान केल्याचा आरोप रमादेवी यांनी केला

आझम खान यांनी अखेर लोकसभेत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे.भाजपा खासदार रमादेवी यांच्याबाबत आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच आझम खान यांनी माफी मागितली आहे. दरम्यान आझम खान यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य आहे. त्यांची वर्तणूक चांगली नाही असं रमादेवी यांनी म्हटलं आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे असंही रमादेवी यांनी म्हटलं आहे. रमादेवी यांच्याबाबत आझम खान यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी एकमुखाने करण्यात आली.

 

आझम खान यांनी माफी मागितली, मात्र भाजपा खासदार रमादेवी या मात्र लोकसभेत चांगल्याच आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. यांना बोलण्याची पद्धत नाही, आझम खान यांनी माझाच नाही देशातल्या स्त्री-पुरुषांचा अपमान केला आहे असेही रमादेवी यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

लोकसभेत जेव्हा तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु होती तेव्हा आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले. आझम खान यांनी रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटलं की, “तुम्ही मला इतक्या आवडता की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं”. रमा देवी यांनी यावर आक्षेप घेत ही बोलण्याची पद्धत नाही असं सांगितलं असता आझम खान यांनी तुम्ही खूप आदरणीय आहात, माझ्या बहिणीप्रमाणे आहात असं म्हटलं. आझम खान यांना त्याचवेळी माफी मागण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला होता. तसेच सगळ्या महिला खासदारांनीही आझम खान यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. शुक्रवारीही या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता. आता आज कामकाजाला सुरुवात होताच आझम खान यांनी माफी मागितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 11:36 am

Web Title: azam khan apologies for his remarks on mp ramadevi scj 81
Next Stories
1 ”एक था टायगर” ते ”टायगर जिंदा है” हा व्याघ्रसंवर्धनाचा प्रवास सुखकारक-मोदी
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 ‘फिर एक बार’ नेतान्याहू सरकार, इस्त्रायलमध्ये निवडणूक प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर
Just Now!
X