आझम खान यांचा दावा; सरकारकडून खंडन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केल्याने नवा वाद उफाळून आला आहे.
नाताळच्या दिवशी मोदी परदेशातून भारतात परतताना लाहोरला उतरले आणि त्यांनी शरीफ यांच्या निवासस्थानला भेट दिली. त्या वेळी मोदी दाऊदला भेटले असे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केले होते, असा दावा आझम खान यांनी केला.
भाजपने खान यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे तर काँग्रेसने हे विश्वास बसण्यासारखे नाही, असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करून मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि तेथे ते दाऊदलाही भेटले, मोदी यांनी याचा इन्कार केल्यास आपण पुरावे देऊ, मोदींनी गुप्तपणे कोणाकोणाची भेट घेतली ते सांगावे, असेही खान म्हणाले.