News Flash

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात दाखल

सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिल्लीमधील 'बाबा का ढाबा'चे मालक रुग्णालयात दाखल

'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न (Photo: PTI)

सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यता आलं आहे. गुरुवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. युट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगित्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यावरुन नंतर अनेक वाददेखील झाले.

काळ बदलला… बाबा का ढाबाचे कांता प्रसाद पुन्हा ग्राहकांच्या प्रतिक्षेत

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसंच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतलं होतं. त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे”. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

कोण आहेत कांता प्रसाद

सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’ चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांची व्यथा युट्यूबवर गौरव वासन याने व्हिडीओच्या माध्यमातून मांडली होती. यानंतर त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मदतीमध्ये मिळालेल्या पैशामुळे कांता प्रसाद यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं.

लाईट्स, CCTV कॅमेरा अन् गल्ला… ‘बाबा का ढाबा’ फेम कांता प्रसाद यांच्या नव्या रेस्तराँची झलक

मात्र त्यानंतर युट्यूबवर गौरव वासन याच्यावरच मिळालेली मदत चोरल्याचा आरोप झाला. त्याच्याविरोधात देणगीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गौरव वासनने हे आरोप फेटाळून लावत आपले बँक स्टेटमेंट जाहीर केले होते.

बाबा का ढाबा प्रकरण : मालकाच्या खात्यावर जमा झाले ४२ लाख; दिल्ली पोलिसांचा अहवाल

पण डिसेंबर महिन्यात कांता प्रसाद यांनीसुरु केलेलं रेस्टॉरंट बंद पडलं. यामुळे कांता प्रसाद यांना पुन्हा आपल्या जुन्या ढाब्यावर परतावं लागलं. यावेळी त्यांनी गौरव वासनची माफीदेखील मागितली. गौरव वासननेही त्यांची भेट घेत आपल्या मनात काही शैल्य नसल्याचं म्हणत प्रकरण मिटवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 2:29 pm

Web Title: baba ka dhaba owner kanta prasad attempts suicide admitted to hospital in delhi sgy 87
Next Stories
1 पेट्रोल-डिझेल दर वाढीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला टोला, म्हणाले…
2 तृणमूलच्या खासदाराला कानशिलात लगावणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या झाल्याचा कुटुंबाचा दावा
3 पेज ब्लॉक केल्यामुळे सनातन संस्थेची फेसबुक विरोधात हायकोर्टात याचिका
Just Now!
X