News Flash

रामदेव बाबांच्या करोनिल औषधाची किंमत किती? सर्वसामान्यांना विकत मिळेल का?

आता प्रतीक्षा आयुष मंत्रालयाच्या परवानगीची

बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वीच हे औषध बाजारात आणलं होत. (संग्रहित छायाचित्र)

करोनावरील औषध कधी येतं याची प्रतीक्षा असणाऱ्या साऱ्यांनाच धक्का देत योगगुरू रामदेव बाबा यांनी करोनावर भल्यामोठ्या पत्रकार परिषदेत औषध लाँच केलं. “करोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत करोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीनं केला होता. या औषधाची किंमत आणि ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल की नाही, या बाबी आता समोर आल्या आहेत.

हे औषध लाँच करताना बाबा रामदेव म्हणाले होते की, “जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीनं करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली आहे.”

पण करोनिल हे औषध लाँच होताच आयुष मंत्रालयानं पतंजलीच्या या आयुर्वेदिक औषधाची वैधता तपासण्याचा निर्णय घेतला. तसेच याच्या संशोधनाचे सर्व कागदपत्रही मागितले. बुधवारी पतंजलीनं ते आयुष मंत्रालयाला दिले आहेत. मात्र आयुष मंत्रालयानं या औषधाच्या विक्री आणि विपणनावर स्थगिती आणली. जोवर यासंबंधी टास्कफोर्स निर्णय देत नाही, तोवर पतंजलीला हे औषध विकता येणार नाही किंवा त्याचं प्रमोशन करता येणार नाही, असं आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं.

करोनावरी औषध असं म्हटलेल्या करोनिलची किंमत किती?
पतंजलीनं करोनावरी औषध म्हणून एक किटच लाँच केली आहे. या किटमध्ये ३० दिवसांचे डोस आहेत. यासाठी ५४५ रुपये किंमत मोजावी लागेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. सात दिवसांत हे करोनिल औषध बाजारात उपलब्ध होईल, असा दावा पतंजलीनं केला होता. पण, अजूनही या औषधाच्या विक्रीला आयुष मंत्रालयानं परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ते सध्या तरी बाजारात उपलब्ध होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 6:41 pm

Web Title: baba ramdev pantanjali coronavirus coronil kit price rate dose acharya balkrishna pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना संकट वाढल्याने ‘या’ देशाने केलं लष्कराला पाचारण
2 लॉकडाउनमुळे दुकान बंद पडल्याने झाला मानसिक परिणाम; तासनतास मूर्तीप्रमाणे एकाच जागी राहतो उभा
3 “त्यांच्या लायसन्सच्या अर्जावर करोनाचा उल्लेखही नव्हता; पतंजलीला औषधाबद्दल नोटीस देणार”
Just Now!
X