पतीसोबत झालेल्या भांडणानंतर महिलेने रागाच्या भरात आपल्या एका महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा रस्त्यावर लोकांची गर्दी होती. मोबाइलवर ही घटना कैद झाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत महिला पतीसोबत जोरजोरात भांडत असताना दिसत आहे. पती त्यावेळी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असता महिला त्याचा पाठलाग करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मूल आपलं नसल्याचं पतीचं म्हणणं होतं आणि त्यावरुनच दोघांमध्ये भांडण सुरु झालं.
महिला रस्त्यात पतीसोबत भांडताना जोरजोरात ओरडत होती. तसंच बाळाला पतीकडे सोपवण्याचाही प्रयत्न करत होती. यानंतर महिला अचानक बाळाला खेचून घेते आणि जमिनीवर आपटते. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्यांनाही धक्का बसला.
यानंतर पती बाळाला उचलून घेत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात करताना दिसत आहे. या सगळ्या प्रकारात बाळाकडे मात्र कोणाचंही लक्ष नव्हतं. अखेर एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने बाळाला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 3:55 pm