News Flash

आईने तान्हुल्याला धावत्या ट्रेनमधून फेकले

आई म्हणजे प्रेम, वात्सल्य! मात्र पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगाना जिल्ह्यातील नैहाती रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने आपल्या २० महिन्यांच्या मुलाला धावत्या

| December 3, 2013 01:01 am

आई म्हणजे प्रेम, वात्सल्य! मात्र पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगाना जिल्ह्यातील नैहाती रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने आपल्या २० महिन्यांच्या मुलाला धावत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रकार घडला आहे. अन्य प्रवाशांनी प्रसंगावधान राखून या मुलाला वाचवले आणि नैहातीमधील रुग्णालयात दाखल केले.
पूर्णिमा साहा असे या महिलेचे नाव असून, तिने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. या महिलेचा पती लॉटरी तिकीट विकतो. तो बाहेरगावी गेला असता, तिने २० महिन्यांचे बालक आणि १४ वर्षांच्या मुलीसह कृष्णानगर स्थानकातून प्रवासाला सुरुवात केली होती. ही महिला मानसिकदृष्टय़ा अस्थिर असल्याचे तिच्या पतीने पोलिसांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:01 am

Web Title: baby thrown out from running train by mother
टॅग : Kill,Mother
Next Stories
1 इशरत जहाँप्रकरणी सीबीआयचे पूरक आरोपपत्र
2 ‘माध्यमांचे फक्त मोदींकडे लक्ष; काँग्रेसकडे दुर्लक्ष’
3 तेजपालांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘पुरूषार्थ’ चाचणी
Just Now!
X