News Flash

बजाज चेतक पुन्हा भारतीय रस्त्यांवर दिसणार

लोकप्रिय बजाज चेतक रिलाँच करण्यात येणार

सौजन्य- GaadiWaadi.com

कधीकाळी भारतीयांच्या मनावर आणि रस्त्यांवर अधिराज्य गाजवणारी बजाज चेतक पुन्हा एकदा बाजारात परतणार आहे. १९७२ मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेली बजाज चेतक ही देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्कूटर्सपैकी एक आहे. २००६ मध्ये बजाज कंपनीने चेतक स्कूटरचे उत्पादन थांबवले. २००२ मध्ये बजाज कंपनीने फोर स्ट्रोक इंजिन असलेल्या चेतकची निर्मिती केली होती.

देशभरात स्कूटर्सची मागणी वाढत असल्याने बजाज पुन्हा एकदा स्कूटर उत्पादनाकडे वळणार आहे. स्कूटर विभागातील ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी बजाजकडून चेतक रिलाँच करण्यात येमार आहे. चेतक संपूर्ण नव्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांसह २०१७ मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. चेतकला होंडा ऍक्टिवा १२५ आणि टिव्हीएस जुपिटरकडून मोठी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे.

चेतकच्या लॉचिंगबद्दल बजाजकडून अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बजाज चेतकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, आरामदायी सस्पेन्शन, सीटखाली जास्तीत जास्त साठवण क्षमतेसह अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये असणार आहेत. चेतकच्या सीट्स लेदरच्या असतील, असे चेतकच्या छायाचित्रावरुन दिसून येते आहे. चेतकला ग्लॉसी रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याचा अंदाज छायाचित्रावरुन व्यक्त करण्यात येतो आहे.

चेतक नव्या हेडलॅम्प क्लस्टर, इंडिकेटर्ससह बाजारात दाखल होईल. बजाज चेतक फोर स्ट्रोक इंजिनसह १२५ सीसी किंवा १५० सीसी प्रकारात उपलब्ध असेल. जुन्या चेतकपेक्षा शक्तीशाली इंजिन आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स नव्या चेतकची वैशिष्ट्ये असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 4:39 pm

Web Title: bajaj planning to relaunch chetak in india
Next Stories
1 राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीला चौथ्यांदा मुदतवाढ, २ डिसेंबरपर्यंत मोफत प्रवास
2 ‘बोटावर शाई लावण्याऐवजी जनतेच्या तोंडाला काळे फासले असते तर बरे झाले असते’
3 नोटाबंदी: लोकसभा अध्यक्षांवर खासदाराने फेकले कागद
Just Now!
X