पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ला करुन हा तळ उद्धवस्त केला होता. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी ही माहिती दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.

आता पाकिस्तानने पुन्हा त्या ठिकाणी लोकांची जमवाजमव सुरु केली आहे असे जनरल रावत म्हणाले. कालच एका वर्तमानपत्राने बालकोटमधील दहशतवादी तळ सुरु झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले आहे.

“५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या जवानांना ठाऊक आहे. आम्ही पूर्णपणे अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची खबरदारी घेऊ” असे बिपीन रावत म्हणाले.

चेन्नईत अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. घुसखोरीचे डाव उधळून लावण्यासाठी आणखी एक स्ट्राइक करण्याची लष्कराची योजना आहे का ? या प्रश्नावर रावत यांनी आम्ही पुन्हा तशीच कारवाई का करु? त्याच्यापुढे का जाऊ नये? आम्ही काय करु शकतो यावर त्यांनाच विचार करुं दे असे उत्तर दिले.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Army Chief General Bipin Rawat: Balakot has been re-activated by Pakistan, very recently. This shows Balakot was affected, it was damaged; it highlights some action was taken by the Indian Air Force at Balakot &amp; now they have got the people back there. <a href=”https://t.co/IFN7SjJDud”>pic.twitter.com/IFN7SjJDud</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1176010236961812480?ref_src=twsrc%5Etfw”>September 23, 2019</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js&#8221; charset=”utf-8″></script>

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-२००० फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले. पुढच्या काही दिवसात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण करणार आहेत. त्यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दावरुन भारताला घेरण्याची तयारी केली आहे.