09 December 2019

News Flash

इंडोनेशियातील ‘माउंट आगुंग’ ज्वालामुखीचा उद्रेक, अतिदक्षतेचा इशारा

साडेपाच हजारांहून अधिक प्रवाशी विमानतळावर अडकले

ज्वालामुखीच्या उद्रेकापासून सुमारे २५,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

इंडोनेशियाच्या बालीमध्ये ‘माउंट आगुंग’ या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं स्थानिक प्रशासनाने बालीमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

इंडोनेशियाच्या बाली बेटावरील ज्वालामुखीचा या आठवड्यातला हा दुसरा उद्रेक आहे. माउंट आगुंग या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात प्रचंड धूर आणि राख परसली आहे. त्यामुळे बाली विमानतळ २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे सुमारे साडेपाच हजारांहून अधिक प्रवाशी विमानतळावरच अडकले आहेत.

बालीमध्ये नेहमीच परदेशी पर्यटकांची गर्दी असते. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून सुमारे २५,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये सध्या १०० हून अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत.

First Published on November 27, 2017 11:23 am

Web Title: bali volcano eruption indonesia raises alert level to highest stage
टॅग Indonesia
Just Now!
X