News Flash

#CAA : पुन्हा आंदोलनाची शक्यता; उ. प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. दरम्यान, आज होणाऱ्या नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गाझियाबाद, मेरठ, कानपुर, अलीगढसोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी रात्रीपासून मोबाईल इंटरनेटवर बंद करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डिसेंबर महिन्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अफवांवर आला घालण्यासाठी लखनौ, गाझियाबाद, मेरठ, अलिगढ, सहारनपूर, बुलंदशहर, बिजनोर, मुझफ्फरनगर, शामली, संभल, फिरोझाबाद, मथुरा, आग्रा, कानपूर आणि सितापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर मेरठ आणि अलिगढमध्ये गुरूवारी रात्री दहा वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. दरम्यान, पोलिसांनीही राज्यात शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसंच अनेक ठिकाणी अधिकारी पोलिसांसह फ्लॅगमार्चदेखील काढत आहेत.

शुक्रवारच्या नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर केली आहे. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांशीही संवाद साधण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या माहितीवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) पी.व्ही. रामशास्त्री यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 7:48 am

Web Title: ban on mobile internet in uttar pradesh caa protest friday prayers jud 87
Next Stories
1 ‘टुकडे-टुकडे गँग’ला अद्दल घडवा!
2 प्रवासी रेल्वेगाडय़ांचे भाडे वाढवण्याबाबत विचार सुरू
3 ‘नागरिकत्व दुरुस्ती’साठी ३ कोटी कुटुंबांशी संवाद!
Just Now!
X