30 May 2020

News Flash

गणेश मूर्तिकारांना दिलासा

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी वर्षांसाठी शिथिल

संग्रहित छायाचित्र

राज्यातील गणेश मूर्तिकारांना केंद्राने मोठा दिलासा दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर असलेली बंदी एका वर्षांसाठी स्थगित केली गेली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

करोनामुळे विविध क्षेत्रांचे आर्थिक नुकसान झाले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा साठा असलेल्या मूर्तिकारांना या बंदीचा फटका बसणार आहे. त्यामुळे बंदीचा निर्णय एका वर्षांसाठी प्रलंबित ठेवला आहे.

थर्माकॉल, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टिकपासून मूर्ती बनवण्यास मनाई करणारा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. मातीपासून मूर्ती बनवण्यावर भर द्यावा, असे प्रदूषण मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा साठा करून ठेवल्याने हा निर्णय तातडीने अमलात आणणे अवघड आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मूर्तिकारांना एका वर्षांसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवण्याची परवानगी दिली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आधीच बनवल्या असून बंदी घातल्यास त्याची विक्री करता येणार नाही. करोनाच्या आपत्तीच्या काळात मूर्तिकारांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रदूषण मंडळाने याच महिन्यात घेतलेल्या फेरनिर्णयाला स्थगिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:16 am

Web Title: ban on plaster of paris relaxed for years abn 97
Next Stories
1 सिंगापूरमध्ये भारतीयांवर गुन्हा
2 मुलीने आजारी वडिलांना सायकलवर बसवून पार केलं १२०० किमी अंतर, इवांका ट्रम्पही भारावल्या
3 दुर्दैवी! नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण, डॉक्टरही हळहळले
Just Now!
X