विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे धर्माच्या आधारावर विभागणी होण्याची भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानस भुनिया यांनी व्यक्त केली. अशी बंदी घालून ममता बॅनर्जी तोगडिया यांना त्यांचे विचार मांडण्यापासून रोखू शकतील काय, असा सवाल भुनिया यांनी केला आहे. तोगडिया यांच्या विचाराच्या विरोधात राजकीय लढाई करता येईल, मात्र अशा बंदीमुळे प्रश्न सुटणार नाही, असा दावा भुनिया यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लोकशाही व धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.