येथील व्हिबग्यॉर माध्यमिक शाळेत एका सहा वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर आता वाढत्या सार्वजनिक निषेधामुळे शाळेचे अध्यक्ष रुस्तम केरावाला यांनाही अटक करण्यात आली. भादंविच्या विविध कलमान्वये तसेच बाल न्याय कायदा व बाल लैंगिक गुन्हे सुरक्षा कायदा अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी वार्ताहरांना सांगितले.  या प्रकरणी स्केटिंग प्रशिक्षक असलेला मुख्य आरोपी मुस्तफा याला रविवारीच अटक करण्यात आली आहे. २ जुलैला या मुलीवर बलात्कार झाला होता.