News Flash

बंगळूरू हिंसाचार: जमावानं काँग्रेस आमदाराचं घर जाळलं, ३ कोटींचा ऐवज लुटला!

मूर्ती यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

बंगळूरूमध्ये उसळलेल्या हिंसाचारात कर्नाटकचे काँग्रेस आमदार अखंडा श्रीनिवास मूर्ती यांचं डी जे हल्ली या ठिकाणचं घर दंगलखोरांनी पेटवून दिलं. तसंच हिंसाचारादरम्यान त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ कोटी रुपयांचा ऐवजही त्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमधील तक्रारीनुसार, २०००-३००० लोकांनी आमदार मूर्ती यांचं घर आणि खासगी वाहनांसह इतर मालमत्ता ११ ऑगस्ट रोजी पेटवून दिली. मात्र, या हल्ल्यानंतर आमदारांनी तीन दिवसांनंतर ही तक्रार दाखल केली आहे. शहरात जमावबंदीचं १४४ कलम लागू केल्याने त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यानं हा उशीर झाल्याचं आमदारांनी म्हटलं आहे.

माध्यामांतील वृत्तांनुसार, काँग्रेस पक्षाचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचं मूर्ती यांनी म्हटलं आहे. दंगलखोरांनी आमदार मूर्ती यांचं घर टार्गेट केलं कारण त्यांचा भाचा पी. नवीन यांनी फेसबुकवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतरच ११ ऑगस्ट रोजी हिंसाचार उसळल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या हिंसाचारामध्ये ३५ आणखी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एकूण अटक आरोपींची संख्या ३४० वर पोहोचली आहे. यामध्ये काँग्रेसच्या नगरसेविका इर्शाद बेगम यांचे पती कलीम पाशा यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे निकटवर्तीय आणि कर्नाटकचे माजी मंत्री के. जे. जॉर्ज यांच्याशी पाशा यांचे जवळचे संबंध आहेत. तसेच त्यांचा एसडीपीआय या संघटनेशी संबंध आहे. या हिंसाचारानंतर राज्य सरकारनं या भागात १८ ऑगस्टपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 5:06 pm

Web Title: bangalore violence crowds torch congress mlas house loot rs 3 crore aau 85
Next Stories
1 …आणि २०१४ मध्ये हिंदुत्वासाठीच्या युद्धाची झाली सुरूवात; सुब्रमण्यम स्वामींचं विधान
2 “फेसबुक व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या ताब्यात, पसरवताहेत द्वेष आणि खोट्या बातम्या”
3 हद्दच झाली! तहसीलदारांनं मागितली १ कोटींची लाच; घरात, गाडीत सापडले लाखो रुपये
Just Now!
X