बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात केलेल्या गुन्ह्य़ांसाठी बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीचा नेता मोहम्मद कमरुझ्झमान याला शनिवारी फाशी देण्यात आली. युद्धकाळातील गुन्ह्य़ांसाठी फाशी देण्यात आलेला जमात-ए-इस्लामीचा कमरुझ्झमान हा दुसरा नेता आहे. यापूर्वी कादर मुल्ला याला फाशी झाली होती. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेचा फेरविचार करण्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने माफी मिळवण्याच्या पर्यायाचा विचार सोडून दिला.