बांगलादेशच्या माजी पंतप्रधान व विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया आणि त्यांचा नामधारी पुत्र तारीक रेहमान यांनी भ्रष्ट मार्गाने १० लाख अमेरिकी डॉलर्सचा निधी जमविला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. खालिदा झिया यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या नावे मदतनिधी उभारल्याचा आरोप आहे.बांगला नॅशनलिस्ट पार्टीच्या सर्वेसर्वा असलेल्या खालिदा झिया या आरोपप्रकरणी बुधवारी न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. झिया, त्यांचा पुत्र रेहमान व अन्य १० जणांविरोधात न्यायालयाने आरोपपत्र ठेवले आहे. ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ मध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी खालिदा झिया यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हा ट्रस्ट उभारण्यासाठी झिया यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप असून त्याप्रकरणी २०११ मध्ये त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला.
बांगला देशच्या भ्रष्टाचार विरोधी आयोगानेही २००९ मध्ये झिया यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.