News Flash

डेबिट कार्ड ATM मध्ये स्वाइप केल्यानंतर खात्यात पैसे नसले तरीही लागतो इतका चार्ज

डिजिटल पेमेंटकडे वळवण्यासाठी वेगवेगळया योजना आखल्या

डेबिट कार्ड ATM मध्ये स्वाइप केल्यानंतर खात्यात पैसे नसले तरीही लागतो इतका चार्ज
प्रातिनिधिक छायाचित्र

लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहारांवर भर द्यावा यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. रोजच्या दैनंदिन व्यवहारात रोख रक्कमेचा वापर कमी करुन ग्राहकांना डिजिटल पेमेंटकडे वळवण्यासाठी वेगवेगळया योजना आखल्या जात आहेत. यामध्ये बँकांची भूमिका महत्वाची आहे पण प्रत्यक्षात बँका मात्र ग्राहकांकडून अनावश्यक शुल्क वसूल करत असल्याचे दिसून आले आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी ज्यावेळी तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप करता त्यावेळी तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसले तर ट्रॅन्झॅक्शन डिक्लाइन (नाकारले) असा मेसेज येतो.

आता या ट्रॅन्झॅक्शन डिक्लाइनसाठीही बँका १७ ते २५ रुपयादरम्यान शुल्क आकारत आहेत. एटीएम किंवा पीओएस मशीनमध्ये डेबिट कार्डचे ट्रॅन्झॅक्शन डिक्लाइन झाले तर एसबीआयकडून प्रत्येकवेळी १७ रुपये शुल्क आकारले जाते. पीओएस मशीनने ट्रॅन्झॅक्शन डिक्लाइन केले तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेकडून २५ रुपये शुल्क आकारले जाते.

बँकांकडून आकारले जाणारे हे शुल्क अनावश्यक आहे. ज्यांचे घर महिन्याच्या पगारावर चालते, ज्यांची फारशी बचतही नाही अशा लोकांकडून शुल्क वसूल केल्यामुळे डिजिटल पेमेंट व्यवस्थेबद्दल नकारात्मकता निर्माण होते असे आयआयटी मुंबईतील गणिताचे प्राध्यापक आशिष दास यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 4:14 pm

Web Title: bank charges for transaction declined from debit card
Next Stories
1 Video : मतदान रोखण्यासाठी विरोधकांनी संसदेत सोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या
2 सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
3 बांगलादेशचा संघ नेहमी असा का वागतो?