दिल्लीतील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी ५५ लाख रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत प्रवेश केला आणि  बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी तोडुन रोख रक्कम चोरी केली. सोमवारी सकाळी बँक कर्मचारी त्यांच्या कामावर पोहोचले. त्यानंतर झालेल्या घटनेवीषयी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना माहिती दिली होती. दरम्यान या चोराला पोलिसांनी पकडले आहे. चोराने एकट्यानेचं ही चोरी केली होती.

बॅंकेजवळ गल्लीत, हरिराम नावाचा एक माणूस गवंडी व सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यानी हेल्मेट घालून बँकेच्या शेजारच्या इमारतीची भिंतला भगदाड पाडून आत प्रवेश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिराम याला रविवारी रात्री फर्श बाजार परिसरातील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ५५ लाखांची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पैसे चोरल्यानंतर त्याने काही काही पैसे मित्र कालीचरण यालाही दिले.

दिल्ली: भिंतीला भगदाड पाडून बॅंकेवर दरोडा; ५५ लाखाची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेऱ्यांची दिशा बदलल्यानंतर हरिरामने बँक बंद केली. घटनेच्या वेळी त्याने हेल्मेट घातले होते. बँकेत घुसून त्याने ५५ लाख रुपये चोरून नेले. त्याने ३ महिन्यांपूर्वी चोरीची योजना आखली होती. परंतु लॉकडाउन असल्याने तो गॅस कटर इत्यादी चोरीचा माल घेऊ शकला नाही. दोन वर्षांपूर्वी बॅंकेच्या पुढच्या इमारतीत सिक्युरिटी गार्ड असल्याने हरिराम यांना बँक अधिकारी ओळखत होते. याच्याकडूनच बँक अधिकाऱ्यांनी भगदाड निट करून घेतले व त्याला याचे पैसे सुद्धा दिले.